
शिवलीलामृत अभ्यास वर्ग (ऑनलाईन)
महाशिवरात्र म्हणजे देवांचा देव महादेव यांच्या उपासनेचे परम पावन असे पर्व … सर्व देवांमध्ये श्रेष्ठ देवता म्हणजे भोलेनाथ भगवान श्री शंकर हे आहेत. भक्तांवर कृपा करणारे, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आणि थोड्याश्याही प्रामाणिक उपासनेने प्रसन्न होणारे दैवत म्हणजे महादेव हे आहेत. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये भगवान शंकरांचे आणि त्यांच्या विविध भक्तांचे वर्णन आलेले आहे. त्यावर पू. श्रीधरस्वामी यांनी ओवीबद्ध काव्य रचले आहे. त्याचे नाव शिवलीलामृत असे आहे. अत्यंत प्रत्ययकारी, सर्व मनोकामना पूर्ण करणारे आणि अतीव आनंद देणारे असे हे स्तोत्र काव्य आहे. यामध्ये भगवान शंकरांच्या उपासनेचा महिमा, उपासनेच्या विविध पद्धती, अनेक व्रत वैकल्ये, रुद्राध्याय, रुद्राक्ष, भस्म यांचे माहात्म्य याबाबत भक्तांसाठी उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे.
महाशिवरात्रीचे माहात्म्य अपरंपार आहे. भगवान शिव ही अत्युच्य अनुभूती देणारी देवता आहे. वेदांमध्ये, पुराणांमध्ये, प्राचीन संस्कृत साहित्यातील विविध ग्रंथांमध्ये शिव महात्म्याविषयी सांगितले गेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि मृत्यूनंतर सद्गती देणारा देव म्हणजे भगवान शंकर हा आहे. गेली शेकडो वर्षे करोडो भक्त भगवान शंकरांची उपासना करीत आहेत. १२ ज्योतिर्लिंगे, कैलास मानसरोवर, पंच कैलास, पंच केदार, महाकुंभ इ. सर्व ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांचा अविर्भाव दिसून येतो. कोणतीही उपासना किंवा अनुष्ठान नीट समजून समजून केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे शास्त्र सांगते. या अभ्याक्रमाने शिव लिलामृत ग्रंथ माहात्म्य, त्याचा इतिहास, निर्मिती, उद्देश, त्यातील ज्ञान भांडार, माहात्म्य, पारायण - पठण पद्धती यांचे ज्ञान सहभागी व्यक्तींना मिळेल. अनेक शंकांचे निरसन होईल.
सर्व शिवभक्त, शिव अनुयायी आणि अभ्यासक यांना शिवलीलामृत ग्रंथाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आणि शास्त्रशुद्धरीत्या समजून घेता यावे यासाठी या अभ्यासवर्गाचे आयोजन केले आहे. सहभागीना प्रमाणपत्र मिळणार...
🟧 अभ्यासवर्गातील विषय:
✅ भगवान शंकर देवतेची ओळख
✅ स्कंदपुराणाची ओळख
✅ भगवान शंकर या देवतेचे माहात्म्य आणि वैशिष्ट्ये
✅ शिवलीलामृत ग्रंथाची ओळख
✅ शिवलीलामृताचे पारायण कसे करावे ?
✅ शिवलीलामृताची फलश्रुती
✅ भगवान शंकरांच्या विविध उपासना पद्धती
✅ शंकरांना प्रिय व्रते आणि अनुष्ठाने
✅ पुराणांमध्ये वर्णिलेले शिव माहात्म्य
✅ प्राचीन संस्कृत साहित्यातील ग्रंथांमध्ये वर्णिलेले शिव माहात्म्य
✅ विविध शिव भक्तांच्या कथा
✅ रुद्राक्ष आणि रुद्राध्याय यांचे माहात्म्य
✅ शिवाला भस्म का प्रिय आहे? भस्म माहात्म्य
✅ शिवलीलामृताच्या पठणाचे लाभ इ.
✅ रेकॉर्डिंग
✅ ई-प्रमाणपत्र
सुचना: एकदा नोंदणी केल्यावर रद्द करता येणार नाही